|
ब्रह्म मुहूर्त एक संस्कृत शब्द आहे जो दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे 'ब्रह्म' व 'मुहूर्त'. जेथे 'ब्रह्म' चा अर्थ आहे परम तत्व म्हणजे परमात्मा आणि 'मुहूर्त' म्हणजे काळ.
अशा प्रकारे हा मुहूर्त देवांचा काळ मानला जातो. रात्रीची शेवटची प्रहर आणि सूर्योदयापूर्वीची वेळ याला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. हिंदू धर्मात हे मुहूर्त हा सर्वोत्तम काळ मानला जातो. प्राचीन काळी ऋषीमुनींनी हा काळ भगवंताचे ध्यान करण्यासाठी सर्वोत्तम मानला होता. असे मानले जाते की, ब्रह्म मुहूर्तामध्ये वातावरणात सकारात्मक ऊर्जा राहते. या काळात, मनुष्याने केलेल्या सर्व कार्यांना यश मिळते, म्हणून या काळात योग/ध्यान आणि आध्यात्मिक कार्य किंवा क्रियाकलाप केल्याने अनुकूल परिणाम मिळतात.
ब्रह्म मुहूर्त 48 मिनिटांचा तो शुभ काळ आहे, जो सूर्योदयाच्या जवळपास 1 तास 36 मिनिटांपूर्वी प्रारंभ होतो आणि सूर्योदयाच्या 48 मिनिटांपूर्वी समाप्त होते. अश्यात, मानले जाते की, या काळात आपले मन आणि शरीर योग्य संतुलन आणि ताळीमेळीत असते. जर तुम्हाला या वेळेचा लाभ घ्यायचा आहे तर, हे सहज उपाय नक्की करा.
ब्रह्म मुहूर्तात उठण्यासाठी करा हे उपाय
- रात्री लवकर झोपा: या मुहूर्तावर उठण्यासाठी तुमच्या शरीराला लवकर झोपण्यासाठी ट्रेन करा. रोज रात्री सात ते नऊ तास झोपण्याचे ध्येय ठेवावे. हे तुम्हाला उठण्यास मदत करू शकते.
- अलार्म लावा: 15 मिनिटे आधी अलार्म लावा. यामुळे लगेच झोप लगेच उघडेल. तुम्हाला एक-दोन दिवस थोडे सुस्त किंवा थकवा जाणवेल पण त्यानंतर तुम्हाला उत्साही वाटू लागेल आणि मग हळूहळू तुम्हाला त्याची सवय होईल.
- रात्री हलके जेवण करा: ब्रह्म मुहूर्तावर उठण्यासाठी रात्री जड अन्न घेणे टाळावे हे लक्षात ठेवा. त्याऐवजी खिचडी किंवा त्यासारखेच हलके जेवण घेणे सुरू करा. यामुळे पोट साफ राहते आणि उठण्यास ही त्रास होत नाही.
- योग/ध्यान करा: कोणत्या ही प्रकारचे अध्यात्मिक कार्य करण्यासाठी ‘ब्रह्म मुहूर्त’ हा उत्तम काळ आहे. यावेळी ध्यान केल्याने ज्ञान, शक्ती, सौंदर्य आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते. यासाठी मोकळ्या जागेत किंवा घराच्या स्वच्छ कोपऱ्यात सुगंधित मेणबत्त्या किंवा धूप लावून योग साधना करा.
ब्रह्म मुहूर्त मध्ये चुकून ही करू नका हे कार्य
- काही लोक सकाळी उठल्याबरोबर बेडवर चहा आणि नाश्ता करायला लागतात, ही सवय आरोग्याच्या दृष्टीने खूप वाईट आहे. या मुहूर्तामध्ये चुकून ही अन्न घेऊ नये. त्यामुळे तुमच्या अवतीभवती आजारांचा प्रादुर्भाव सुरू होतो.
- या काळात कोणत्या ही प्रकारची जड शारीरिक क्रिया करणे टाळा आणि तुमचे मन ध्यानाकडे एकाग्र करा.
- या वेळी टीव्ही, कॉम्पुटर किंवा मोबाईल फोन यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे टाळा कारण, ही उपकरणे ध्यानात व्यत्यय आणतात.
- तुम्ही या मुहुर्तात जास्त आवाज करणे टाळावे कारण, असे केल्याने तुमचे लक्ष ध्येयापासून विचलित होऊ शकते. सर्वोत्तम परिणामांसाठी शांततापूर्ण वातावरण ठेवा.