• Talk To Astrologers
 • Brihat Horoscope
 • Personalized Horoscope 2024
 1. भाषा :

जुलै 2024 पंचक तारीख आणि वेळ

Change panchang date

जुलै 2024 पंचक तारीख आणि वेळ New Delhi, India

पंचकसुरवातीचा काळ पंचकशेवटचा काळ
मंगळवार, 23 जुलै 09:21:05 वाजता शनिवार, 27 जुलै 13:00:31 वाजता

वैदिक ज्योतिष च्या अंतर्गत कुठल्याही शुभ कार्याचे मुहूर्त जाणून घेण्यासाठी आम्हाला पंचांगची आवश्यकता असते. पंचांगाच्या द्वारे विभिन्न प्रकारचे वार, तिथि, नक्षत्र, करण तसेच योग याची माहिती प्राप्त होते. याच पंचांगाच्या अंतर्गत मुहूर्तावर लक्ष करते वेळी आपल्याला पंचकवर विशेष लक्ष द्यावे लागते कारण पंचक लागण्याची वेळ मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते. यालाच लक्षात ठेऊन आम्ही पंचक कॅलकुलेटर तुमच्या समोर प्रस्तुत केला आहे. या कॅलकुलेटरच्या माध्यमात तुम्ही जाणू शकतात की कोणत्या दिवशी पंचक प्रारंभ होईल आणि कुठल्या दिवशी समाप्त होईल. याच्या मदतीने तुम्ही पंचकच्या वेळेसंबंधी पूर्ण माहिती मिळवण्यासाठीचा तुमचा किमती वेळ वाचवू शकतात.

पंचक काय आहे?

वैदिक ज्योतिषाच्या अनुसार 5 असे नक्षत्र आहे ज्यांच्या विशेष संयोगाने बनणाऱ्या योगाला पंचक सांगितले जाते. हे पाच नक्षत्र शुभ कार्यासाठी दूषित मानले जाते या कारणाने काही विशेष कार्यांना पूर्ण करण्याआधी पंचकला विशेष लक्षात ठेवले जाते. वैदिक ज्योतिषच्या अनुसार नक्षत्र चक्रामध्ये 27 नक्षत्रांचे वर्णन केले गेले आहे. या नक्षत्रांच्या आधारावरच सर्व 12 राशिमध्ये सर्व 27 नक्षत्रांना विभक्त केले गेले आहे. ज्यामुळे एका राशित जवळपास सव्वा दोन नक्षत्र येतात. एका नक्षत्राचा मान 13 अंश 20 मिनिटांचा असतो आणि प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात ज्यामध्ये प्रत्येक चरण 3 अंश 20 मिनिटाचा असतो. एका राशिचा मान 30 अंशचा असतो. जेव्हा चंद्र आपली गती कर्त्यावेळी कुंभ आणि मीन राशि मध्ये संक्रमण करते त्याच वेळी पंचक लागते.

कोणते आहे पंचक नक्षत्र?

जसेही चंद्र देव कुंभ राशित प्रवेश करतात धनिष्ठा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणाचा प्रारंभ होतो. त्यानंतर शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती कडून चंद्र देव पुढे जातात. याप्रकारे या पाच नक्षत्राची गती करून चंद्र देवाला जवळपास 5 दिवसाचा वेळ लागतो. ह्याच पाच दिवशी आणि ह्याच पाच नक्षत्रांना पंचक म्हणतात. कारण 27 दिवसात चंद्रदेवही सर्व राशींमध्ये भ्रमण करून परत त्याच राशिमध्ये प्रवेश करतात म्हणून, 27 दिवसाच्या आवृत्तीनंतर पुनः पंचक लागते.

पंचकचे महत्व

हिंदु संस्कृतीत सर्व कार्य मुहूर्त पाहून करण्याचा रीतिरिवाज आहे. शुभ मुहुर्तात केले गेलेले कार्य सहजरितीने तसेच यशस्वी असतात तसेच मुहूर्ताविना केलेल्या कार्यामध्ये यशस्वी होण्यात संदेह राहतो. याच मुहूर्ताचे लक्षात घेऊन काही विशेष कार्यांच्या निमित्त पंचागाला विशेष महत्व दिले गेले आहे.

पंचकच्या अनुसार कार्याची आवृत्ती

पंचक मध्ये पाच नक्षत्राचा योग असतो म्हणून मानले जाते की, पंचकाच्या वेळी जर काही अशुभ कार्य झाले तर तो पाच वेळा पुनः होतो. अर्थात त्यानंतर त्याची पाच वेळा पुनरावृत्ती होते. म्हणून पंचकाच्या वेळी होणारे अशुभ कार्याचे निवारण करणे अति आवश्यक असते. विशेषतः जर पंचकच्या वेळी कुणी व्यक्तीचा मृत्यू झाला तर घर कुटुंबात पाच लोकांवर मृत्यूचे समान संकट फिरत असते. म्हणून त्याच्या मृत्यूच्या वेळी दाह संस्काराच्या वेळी पीठ आणि तांदूळ याचे पाच पुतळे बनवून मृतकाच्या सोबत त्यांचेही दहन संस्कार केले जाते म्हणजे कुटुंबाच्या इतर सदस्यावर पंचकाच्या संकटाची समाप्ती होईल आणि त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही.

पंचकाचे प्रकार

प्रत्येक दिवसाच्या हिशोबाने पंचकाचे वर्गीकरण केले गेले आहे, अर्थात कुठला खास दिवस सुरु होणारे पंचक एक वेगळ्या नावाने जाणले जाते आणि त्यांचा वेग-वेगळा प्रभाव असतो. चला तर मग जाणून घेऊ विभिन्न प्रकारच्या पंचकच्या बाबतीती:

1.  रोग पंचक

जेव्हा पंचकचा प्रारंभ रविवारच्या दिवशी होतो तेव्हा अश्या पंचकला रोग पंचक म्हणतात. रोग पंचकाच्या कारणाने येणारे 5 दिवस विशेष रूपाने सर्व नष्ट आणि मानसिक समस्या देणारे असतात. या पंचांगात शुभ कार्याला सर्वथा त्यागले पाहिजे कारण हे प्रत्येक प्रकारच्या शुभ कार्यांमध्ये अशुभ मानले जाते.

2.  राज पंचक

जेव्हा पंचक सोमवार च्या दिवशी सुरु होते तेव्हा अश्या पंचक ला राज पंचक सांगितले जाते. साधारणतः हे पंचक शुभ मानले जाते आणि त्यांच्या प्रभावाने येणारे सर्व 5 दिवस कार्यामध्ये यशस्विता आणि सरकारी कामकाजात लाभ देतात तसेच संपत्तीने जोडलेल्या कामांसाठीही राज पंचक बरेच उपयुक्त असते.

3.  अग्नि पंचक

मंगळवारच्या दिवशी सुरु होणारे पंचक अग्नी पंचकच्या नावाने जाणले जाते. या वेळी तुम्ही कोर्ट कचेरी आणि वाद इत्यादी च्या निर्णयावर आपले हक्क प्राप्त करण्यासाठी अनेक कार्य करू शकतात. हे पंचक अशुभ मानले जाते म्हणून या पंचकात कुठल्याही प्रकारचे निर्माण कार्य तसेच मशिनरी आणि अवजाराच्या कामात सुरवात करणे अशुभ असते. कारण हे पाहिले जाते की या पंचकात या कार्यांना केल्याने काही नुकसान होण्याची पूर्ण शक्यता असते.

4.  चोर पंचक

शुक्रवारच्या दिवशी सुरु होणाऱ्या पंचकला चोर पंचक म्हटले जाते. चोर पंचक विशेष रूपात यात्रा करण्याच्या उद्धेशाने त्याज्य/ बहिष्कृत मानले जाते. या व्यतिरिक्त या पंचकवर कुठल्याही प्रकारचा व्यापार, देवाण-घेवाण तसेच कुठल्याही प्रकारचा सौदा करू नये. जर तुम्ही असे कार्य केले तर तुम्हाला विशेष रूपात धन हानी होऊ शकते.

5.  मृत्यु पंचक

या क्रमात जेव्हा पंचकची सुरवात शनिवारच्या दिवसापासून होते तेव्हा असा पंचक मृत्यू पंचक मानला जातो. या पंचकाच्या वेळी मृत्यू तुल्य त्रासाची प्राप्ती होऊ शकते आणि हे पूर्णतः अशुभ मानले जाते. या वेळी तुम्हला कुठल्याही प्रकारचे त्रासदायक कार्य आणि कुठल्याही प्रकारची जोखीम पूर्ण कामांपासून वाचवले पाहिजे, कारण या पंचकाच्या प्रभावाने तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ शकतो तसेच तुमच्यासोबत काही दुर्घटना होण्याची संभावना असते. सोबतच आपले व्यक्ती तसेच व्यक्तींनीही वाद स्थिती बनू शकते.

विशेष टीप: याच्या अतिरिक्त जेव्हा कोणी पंचक बुधवार किंवा बृहस्पतीवारला सुरु होते तेव्हा त्यामध्ये कुठल्या उपरोक्त कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचे पालन करणे आवश्यक नसते. या 2 दिवसात सुरु होणाऱ्या पंचकच्या वेळी उपरोक्त सांगितलेल्या कार्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य केले जाऊ शकतात.

पंचक च्या वेळी न केले जाणारे कार्य :

हिंदू धर्म शास्त्राच्या अनुसार पंचकाच्या दरम्यान काही असे कार्य सांगितले गेले आहे ज्याला करू नये कारण याची वेळ अनुकूल नसते.

●  यामध्ये विशेष रूपात दक्षिण दिशेकडे प्रवास करणे वर्जित मानले जाते.
●  सोबतच जर तुमच्या घराचे काम चालू आहे तर पंचकच्या वेळी घराचे छत बनवू नये. अर्थात लेंटर टाकू नये.
●  या व्यतिरिक्त पंचकाच्या वेळी लाकूड, कंडा किंवा अन्य प्रकारच्या इंधनाचे भंडारण करू नये.
●  या व्यतिरिक्तही असे कार्य आहे जे पंचकच्या वेळीच केली पाहिजे त्यामध्ये विशेष रूपात कुठल्याही प्रकारचा पलंग विकत घेणे किंवा बनवणे, बेड खरेदी करणे किंवा बेडचे दान करणेही कष्टदायक मानले जाते.

म्हणून या वेळेत हे सर्व कार्य केले जात नाही. तथापि या सर्व कार्याच्या अतिरिक्त अन्य कुठलेही कार्य तुम्ही पंचकच्या वेळी करू शकतात.

पंचक च्या वेळी केले जाणारे कार्य :

जसे की आम्ही पहिले सांगितले की पंचक सर्व कार्यासाठी अशुभ नसते तर काही कार्यांसाठी पंचक अत्यंत शुभकारी मानले जाते. चला जाणून घेऊ की कोणते आहे ते कार्य जे पंचकच्या दरम्यान केले जाऊ शकते:

पंचकाच्या दरम्यान जे नक्षत्र असतात त्यामध्ये काही विशेष योगांचा निर्माण होतो. जसे की धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद तसेच रेवती नक्षत्र यात्रा करणे, मुंडन कार्य, तसेच व्यापार इत्यादी शुभ कार्यांसाठी प्रशस्त मानले गेले आहे.

या व्यतिरिक्त उत्तराभाद्रपद नक्षत्र वार च्या सोबत मिळून सर्वार्थ सिद्धी योग बनवतो. तथापि आपण पंचक ला अशुभ असल्याची संज्ञा देतो परंतु पंचकाच्या दरम्यान इतर शुभ कार्य जसे की साखरपुडा समारोह, विवाह इत्यादी शुभ कार्य केले जातात. पंचकाचे तीन नक्षत्र पूर्वा भाद्रपद, उत्तर भाद्रपद तसेच रेवती जर रविवारच्या दिवशी आले तर विभिन्न प्रकारचे शुभ योग बनतात ज्यामध्ये चर, स्थिर आणि प्रवर्ध मुख्य आहे. या योगाच्या कारणाने व्यक्तीला यशस्विता प्राप्त होते व त्याला धन लाभ ही होतो.

मुहूर्त चिंतामणी ग्रंथ मुहूर्ताच्या बाबतीत विशेष रूपात प्रकाश टाकतो. यानुसार जर पंचकच्या नक्षत्रामध्ये धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्र चल संज्ञक मानले जाते. म्हणून नक्षत्राच्या दरम्यान कुठलेही चालणारे काम अर्थात गतीने काम करणे अत्यंत अशुभ असते. जसे की कुठल्या प्रकारची यात्रा करणे, वाहन खरेदी करणे, ऑटोमोबाइल संबंधित आणि मशिनरी इत्यादी संबंधित काम करणे इत्यादी. तेच दुसरीकडे उत्तरभाद्र पद नक्षत्राच्या स्थिर संज्ञक नक्षत्र असतो. म्हणून या नक्षत्राच्या दरम्यान अश्या कार्यांसाठी जातात ज्यामध्ये स्थिरतेची आवश्यकता असते. यामध्ये मुख्य रूपात गृह प्रवेश करणे, शांती पूजन करणे, बी पेरणे तसेच जमिनेने जोडलेले स्थिर प्रकृतीचे कार्य केले जाऊ शकते.

अंतिम नक्षत्र रेवती मैत्री संज्ञक नक्षत्र असते. म्हणून या नक्षत्राच्या दरम्यान कुठल्याही प्रकाराच्या वाद-विवादाला संपवणे, व्यापार किंवा कपड्या संबंधित सौदा करणे, नवीन दागिने विकत घेणे इत्यादी संबंधित शुभ कार्य केले जाऊ शकते.

पंचकच्या वेळी या गोष्टींवर ठेवा विशेष लक्ष

शास्त्रांमध्ये काही अशी माहिती दिली गेली आहे ज्याला पंचकच्या वेळी विशेष रूपात लक्षात ठेवले जाते.

1.  यामध्ये प्रत्येक पंचकसाठी विशेष रूपात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहे, जसे की धनिष्ठा नक्षत्राचे पंचक असेल, त्या वेळी कुठल्या प्रकारचे लाकूड, इंधन घास इत्यादी एकत्रित नाही केले पाहिजे, कारण असे करण्याने आग लागण्याची भीती असते.
2.  जर पंचकच्या वेळी कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होतो तर पंचकच्या वेळी त्याच्या शवाचे अंतिम संस्कार करण्याच्या पूर्वी कुठल्या विशेष आणि योग्य पंडितांकडून पूर्ण माहिती घेतली पाहिजे आणि पंचकच्या वेळी शवाचे अंतिम संस्कार करण्यापासून वाचले पाहिजे. जर आवश्यक असेल तर गरुड पुराण च्या अनुसार त्याच्या सोबत पीठ आणि घासचे 5 पुतळ्यांचाही दाह संस्कार पूर्ण विधी पूर्वक नुसार केला गेला पाहिजे नाहीतर मृतकाचे कुटुंब आणि जवळच्या लोकांवर मृत्यूचे संकट फिरत असते.
3.  पंचकच्या वेळी दक्षिण दिशेची यात्रा करू नये कारण दक्षिण दिशेला मृत्यूची देवता यम ची दिशा मानली जाते. अशामध्ये पंचकच्या वेळी दक्षिण दिशेची यात्रा हानिकारक आणि कष्टदायक होऊ शकते.
4.  पंचकच्या वेळी रेवती नक्षत्र चालू असेल तर घराचे छत बनवू नये अर्थात लेंटर टाकू नये. असे मानले जाते की, अश्या करण्याने धन हानी होण्याची शक्यता तीव्र असते आणि कुटुंबात क्लेश स्थिती उत्पन्न होऊ शकते.
5.  पंचकच्या वेळी कुठल्याही प्रकारचे पलंग बनवणेही मोठ्यातल्या मोठ्या संकटांना निमंत्रण देऊ शकते. विशेष रूपात धनिष्ठा नक्षत्राच्या पंचकमध्ये अग्नीचे भय असते आणि शतभिषा नक्षत्रात कलह होण्याची संभावना असते.
6.  पूर्वाभाद्रपदच्या पंचक मध्ये रोग होण्याची संभावना बरीच असते तसेच उत्तर भाद्रपदच्या पंचक मध्ये धन हानी आणि त्रास होण्याची शक्यता आहे.
7.  या व्यतिरिक्त रेवती नक्षत्राच्या पंचकमध्ये मानसिक कष्ट होण्याची प्रबळ संभावना असते. म्हणून पंचकच्या वेळी जे कार्य निषेध मानले जाते त्यांचा त्याग करून अन्य शुभ कार्यांचे संपादन केले जाऊ शकते.

आम्ही अशा करतो की, पंचकाच्या बाबतीत दिली गेली माहिती वाचून तुमच्या ज्ञानात वृद्धी झाली असेल आणि आता तुम्ही पंचकाच्या बाबतीत सर्व प्रकारची माहिती प्राप्त केल्यानंतर आपल्या जीवनात आनंद आणि यशस्विता प्राप्त करू शकाल.

अ‍ॅस्ट्रोसेज मोबाइल वरती सर्व मोबाईल ऍप

अ‍ॅस्ट्रोसेज टीव्ही सदस्यता घ्या

   रत्न विकत घ्या

   AstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रत्न

   यंत्र विकत घ्या

   AstroSage.com वर आश्वासनासह यंत्राचा लाभ घ्या

   नऊ ग्रह विकत घ्या

   ग्रहांना शांत करण्यासाठी आणि आनंदी आयुष्य मिळवण्यासाठी यंत्र AstroSage.com वर मिळावा

   रुद्राक्ष विकत घ्या

   AstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रुद्राक्ष