• Talk To Astrologers
 • Brihat Horoscope
 • Personalized Horoscope 2024
 1. भाषा :

जुलै 2024 भद्र तारीख आणि वेळ

Change panchang date

जुलै 2024 भद्र तारीख आणि वेळ New Delhi, India

भद्र(विष्टी कर्ण)सुरवातीचा काळ भद्र(विष्टी कर्ण)शेवटचा काळ
रविवार, 30 जून 23:23:55 वाजता सोमवार, 1 जुलै 10:28:19 वाजता
गुरुवार, 4 जुलै 05:56:13 वाजता गुरुवार, 4 जुलै 17:25:21 वाजता
मंगळवार, 9 जुलै 18:58:35 वाजता बुधवार, 10 जुलै 07:54:16 वाजता
शनिवार, 13 जुलै 15:07:59 वाजता रविवार, 14 जुलै 04:20:41 वाजता
बुधवार, 17 जुलै 08:56:05 वाजता बुधवार, 17 जुलै 21:04:38 वाजता
शनिवार, 20 जुलै 18:01:33 वाजता रविवार, 21 जुलै 04:58:30 वाजता
मंगळवार, 23 जुलै 20:59:10 वाजता बुधवार, 24 जुलै 07:32:34 वाजता
शुक्रवार, 26 जुलै 23:32:52 वाजता शनिवार, 27 जुलै 10:25:07 वाजता
मंगळवार, 30 जुलै 05:19:51 वाजता मंगळवार, 30 जुलै 16:46:59 वाजता

भद्रा

जेव्हा मुहूर्त पहिला जातो, तेव्हा सर्वात आधी मनामध्ये भद्राचे नाव येते. मुहूर्ताच्या अंतर्गत भद्राचा विचार मुख्य रूपाने केला जातो कारण, हे वास्तवात स्वर्ग लोक, पृथ्वी लोक तसेच पाताळ लोक मध्ये आपला प्रभाव दाखवते. म्हणून कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी भद्रा वास चा विचार केला जातो.

आमच्या द्वारे दिले गेलेले भद्रा कॅलकुलेटर तुम्हाला कुठल्याही दिवसाची भद्रा काळ विषयी माहिती देण्यासाठी बनवले आहे. या कॅलकुलेटर द्वारे तुम्ही सहजरित्या जाणू शकतात की, भद्राची सुरवात आणि समाप्ती कुठल्या वेळी होईल. याच्या मदतीने तुम्ही भद्रा काळचा वेळ सोडून कुठल्याही वेळी शुभ कार्याला संपन्न करू शकतात.

कोण आहे भद्रा?

चला तर मग जाणून घेऊ की, वास्तवात भद्रा कोण आहे आणि यांचे इतके महत्व का मानले गेले आहे? जर आपण धार्मिक गोष्टीचा विचार केला तर यानुसार, भद्रा भगवान शनिदेवाची बहीण आणि सुर्य देवाची पुत्री आहे. ही खूप सुंदर होती परंतु हीचा स्वभाव बराचसा कठोर होता. त्यांच्या स्वभावाला सामान्य रूपात नियंत्रित करण्यासाठी त्यांना पंचांगाच्या प्रमुख अंग विष्टि करणच्या रूपात मान्यता दिली गेली. जेव्हा कधी कुठल्या शुभ तसेच मंगल कार्याच्या वेळी शुभ मुहूर्त पहिला जातो तेव्हा त्यात भद्राचा विचार विशेष प्राधान्याने केला जातो आणि भद्राची वेळ सोडून दुसऱ्या वेळेत शुभ कार्य केले जाते. परंतु असे पहिले गेले आहे की, भद्रा सदैव अशुभ राहत नाही तर, काही विशेष प्रकारच्या कार्यात यांचा वास चांगले परिणाम ही देतो.

भद्राची गणना

तिथी,वार, योग, नक्षत्र आणि करण मुहूर्ताच्या अंतर्गत पंचांगचा मुख्य भाग आहे. यामध्ये करण एक महत्वपूर्ण अंग मानले गेले आहे. एकूणच 11 करण असतात, ज्यामध्ये चार करण शकुनि, चतुष्पद, नाग आणि किंस्तुघ्न अचर असतात आणि शेष सात करण बव, बालव, कौलव, तैतिल, गर, वणिज आणि विष्टि चर असतात. यामध्ये विष्टि करणला ही भद्रा सांगितले जाते. चर होण्याच्या कारणाने हे सदैव गतिशील असतात. जेव्हा पंचांगाची शुद्धी केली जाते, त्या वेळी भद्राला विशेष महत्व दिले जाते.

भद्राचा वास असा जाणून घ्या

चला तर मग जाणून घेऊ की भद्राचा वास कसा ज्ञात केला जातो.

कुम्भ कर्क द्वये मर्त्ये स्वर्गेऽब्जेऽजात्त्रयेऽलिंगे।
स्त्री धनुर्जूकनक्रेऽधो भद्रा तत्रैव तत्फलं।।

जेव्हा चंद्र मेष, वृषभ, मिथुन आणि वृश्चिक राशिमध्ये होतो तेव्हा, भद्रा स्वर्ग लोकात मानली जाते आणि ऊर्ध्वमुखी होते. जेव्हा चंद्र कन्या, तुळ, धनु आणि मकर राशित असते तेव्हा, भद्राचा वास पाताळात मानला जातो आणि अशामध्ये भद्रा अधोमुखी होते. तसेच जर चंद्र कर्क, सिंह, कुंभ आणि मीन राशिमध्ये स्थित असेल तर भद्राचा निवास भूलोक अर्थात पृथ्वी लोकात असल्याचे मानले जाते आणि अशामध्ये भद्रा सम्मुख होते. ऊर्ध्वमुखी होण्याच्या कारणाने भद्राचे तोंड वरच्या दिशेने असेल तसेच, अधोमुखी होण्याच्या कारणाने खालच्या दिशेने असेल. परंतु दोन्ही परिस्थितीत भद्रा शुभ प्रभाव घेईल. या सोबतच सम्मुख होऊन भद्रा पूर्ण रूपात प्रभाव दाखवेल.

पौराणिक ग्रंथ मुहूर्त चिंतामणीच्या अनुसार भद्राचा वास ज्या लोकात असतो तिथे भद्राचा विशेष प्रभाव मानला जातो. अशा स्थितीमध्ये जेव्हा चंद्र कर्क राशि, सिंह राशि, कुंभ राशि आणि मीन राशित असेल तर भद्राचा वास भूलोकात राहिल्याने भद्रा सम्मुख होईल आणि पूर्ण रूपाने पृथ्वी लोकात आपला प्रभाव दाखवेल. ही अवधी पृथ्वी लोकात कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी वर्जित मनाली जाते, कारण अशामध्ये केले गेलेले कार्य एकतर पूर्ण होत नाही किंवा त्यांना पूर्ण होण्यात खूप वेळ लागतो आणि विघ्न येत असतात.

स्वर्गे भद्रा शुभं कुर्यात पाताले च धनागम।
मृत्युलोक स्थिता भद्रा सर्व कार्य विनाशनी ।।

संस्कृत ग्रंथ पियुष धारच्या अनुसार जेव्हा भद्रा चा वास स्वर्ग लोक आणि पाताळ लोकात होईल तेव्हा पृथ्वी लोकात शुभ फळ प्रदान करण्यात सक्षम होईल.

स्थिताभूर्लोस्था भद्रा सदात्याज्या स्वर्गपातालगा शुभा।

मुहूर्त मार्तंड च्या अनुसार जेव्हा भद्रा भूलोकात असेल तेव्हा तिचा सदैव त्याग केला पाहिजे आणि जेव्हा ती स्वर्ग तसेच पाताळ लोकात असेल तर शुभ फळ प्रदान करणारी असेल.

अर्थात जेव्हाही चंद्राचे संक्रमण कर्क राशि, सिंह, कुंभ राशि तसेच मीन राशित असेल तर भद्रा पृथ्वी लोकात असेल आणि कष्टकरी असेल. अशा भद्रेचा त्याग करणे श्रेयस्कर असेल.

भद्रा मुख तसेच भद्रा पुच्छ

भद्राच्या वास्तु अनुसारच तिचे फळ मिळते. या संदर्भात खालील मुक्ती वाचनीय आहे:

भद्रा यत्र तिष्ठति तत्रैव तत्फलं भवति।

अर्थात भद्रा ज्या वेळी जिथे स्थित असते त्याच प्रकारे ती तिथे फळ देते. तर मग चला जाणून घेऊ की कसे होते भद्रा मुख आणि भद्रा पुच्छ चे ज्ञान?

शुक्ल पूर्वार्धेऽष्टमीपञ्चदशयो भद्रैकादश्यांचतुर्थ्या परार्द्धे।
कृष्णेऽन्त्यार्द्धेस्या तृतीयादशम्योः पूर्वे भागे सप्तमीशंभुतिथ्योः।।

अर्थात शुक्ल पक्षाची अष्टमी तसेच पौर्णिमेच्या पूर्वार्धात आणि एकादशी चतुर्थीच्या उत्तरार्धात भद्रा असते. कृष्ण पक्षाच्या तृतीय तसेच दशमीच्या उत्तरार्धात आणि सप्तमी तसेच चतुर्थीच्या पूर्वार्धात भद्रा असते.

विशेष टीप: इथे लक्ष देण्याची ही गरज आहे की एक पहर 3 तासाचा असतो. त्यानुसार एक दिवस आणि एक रात्र याला मिळवून आठ पहर होतात म्हणजे की 24 तास. उपरोक्त तालिकेमध्ये सांगितले गेलेले पहर च्या पहिल्या 2 तासात अर्थात 5 घटी भद्राचे मुख असते तसेच त्याला शुभ मानले जाते. दुसरीकडे उपरी तालिकेमध्ये सांगितलेले पहरचा शेवटचा तास 15 मिनिटे म्हणजेच तीन घटी भद्राची पुच्छ असते.

दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हटले तर मुहूर्त चिंतामणी ग्रंथाच्या अनुसार चंद्र मास च्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथीच्या पाचव्या प्रहारच्या 5 घटीमध्ये भद्राचे मुख असते, अष्टमी तिथीच्या दुसऱ्या प्रहराच्या कुल मान इत्यादी ची 5 घटि, एकादशीच्या सातव्या प्रहाराची प्रथम 5 घटी तसेच पौर्णिमेच्या चौथ्या प्रहराची सुरवातीमध्ये 5 घटीमध्ये भद्राचे मुख असते, याचप्रकारे चंद्र मास च्या कृष्ण पक्षाची तृतीया च्या आठव्या प्रहर इत्यादी च्या 5 घटी भद्रा मुख असते, कृष्ण पक्ष समाप्तीच्या तिसऱ्या प्रहर आणि चतुर्दशी तिथीचा प्रथम प्रहरच्या 5 घटी मध्ये भद्रा मुख व्याप्त राहते.

भद्राची पुच्छ शुभ होण्याच्या कारणाने यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करू शकतात. तिथीच्या उत्तरार्धात होणारी भद्रा जर दिवसा असेल आणि कुठल्याही पूर्वार्धात होणारी भद्रा जर रात्री असेल तर शुभ मानली जाते.

भद्रा च्या दरम्यान न केले जाणारे कार्य

भद्राला सामान्यतः सर्व शुभ आणि मंगल कार्यात त्याज्य मानले जाते आणि जेव्हा भद्रा चालू होते त्यावेळी शुभ कार्य संपादित करत नाही.

कार्येत्वाश्यके विष्टेरमुख, कण्ठहृदि मात्रं परित्येत।

अर्थात खूप जास्त आवश्यक असल्यास पृथ्वी लोकाची भद्रा, कंठ, हृदय आणि भद्रा मुखाचा त्याग करून भद्रा पुच्छ मध्ये शुभ तसेच मंगल कार्य संपन्न केले जाऊ शकते.

ईयं भद्रा शुभ-कार्येषु अशुभा भवति।

अर्थात कुठल्याही शुभ कार्यात भद्रा अशुभ मानली जाते. आमच्या ऋषी मुनींनीही भद्रा काळाला अशुभ तसेच सुखदायी सांगितले आहे:—

न कुर्यात मंगलं विष्ट्या जीवितार्थी कदाचन।
कुर्वन अज्ञस्तदा क्षिप्रं तत्सर्वं नाशतां व्रजेत।।
---महर्षि कश्यप

महर्षी कश्यपच्या अनुसार जो कोणी प्राणी आपले जीवन सुखी बनवू इच्छितो आणि आनंद पूर्वक आयुष्य घालवण्याची त्याची इच्छा आहे त्याने भद्रा काळाच्या वेळी कुठलेही शुभ कार्य करू नये. जर चुकून असे काही कार्य होऊन गेले तर त्याचा शुभ फळ नष्ट होऊन जातो.

भद्रा काळाच्या वेळी मुख्य रूपात मुंडन संस्कार, विवाह संस्कार, गृहारंभ, कुठला नवीन व्यवसाय आरंभ करणे, गृह प्रवेश, शुभ यात्रा, शुभ उद्दीष्टाने केले जाणारे कार्य तसेच रक्षाबंधन इत्यादी मंगल कार्यांना करू नये.

भद्रा काळाच्या वेळी केले जाणारे कार्य

सामान्यतः सर्व शुभ कार्यांसाठी भद्राचा निषेध मानला गेला आहे. परंतु काही कार्य असे असतात की ज्यांची प्रकृती अशुभ असते, असे कार्य भद्रा काळाच्या वेळी केले जाऊ शकतात. यामध्ये मुख्य रूपाने शत्रूवर आक्रमण करणे, अस्त्र-शस्त्र चा प्रयोग करणे, ऑपरेशन करणे, कोणावर खटला सुरु करण्यासाठी, आग लावणे, म्हैस, घोडा, उंट इत्यादींच्या संबंधित कार्य तसेच कुठल्या वस्तूला कापणे, यज्ञ करणे तसेच स्त्री प्रसंग करणे इत्यादी कार्य यामध्ये समाविष्ट आहेत. जर या कार्यांला भद्र काळाच्या वेळी केले गेले तर यामध्ये वांछित यश मिळू शकते.

भद्राला टाळण्याची पद्धत

आमच्या ज्योतिष शास्त्राची मुख्य विशेषतः ही आहे की, सामान्य जीवनात येणाऱ्या समस्यांना दूर करण्याच्या दिशेमध्ये असे उपाय सुचवले जाते जे मानव जीवनाला पुष्पित आणि पल्लवित करू शकते. या क्रमात भद्राला टाळण्याचे उपाय सांगितले गेले आहे.

सर्वात आधी ज्ञात केले जाते की भद्राचा वास कुठे आहे. जर भद्रा स्वर्ग लोक किंवा पाताळ लोकात आहे तर उपाय करण्याची आवश्यता नसते फक्त मृत्यू लोकात अर्थात पृथ्वी लोकात भद्राचा वास असल्यावर विशेष रूपात हानिकारक मानले जाते आणि म्हणूनच याला टाळले जाते. सोबतच भद्राच्या मुख आणि पुच्छचा ही विचार केला जातो. भद्राला टाळण्यासाठी सर्वात अधिक प्रभावी भगवान शंकराची आराधना करणे मानले जाते. म्हणून अत्यंत आवश्यक काही कार्य तुम्हाला भद्रा वासाच्या दरम्यान करायचा असेल तर भगवान शंकराची आराधना नक्की करा.

या संबंधात निम्नलिखित तथ्यावर विचार केला जाऊ शकतो. या संबंधात पियुष धारा तसेच मुहूर्त चिंतामणी च्या अनुसार:—

दिवा भद्रा रात्रौ रात्रि भद्रा यदा दिवा।
न तत्र भद्रा दोषः स्यात सा भद्रा भद्रदायिनी।।

याचे तात्पर्य हे आहे की जर दिवसाच्या वेळेची भद्रा रात्रीत आणि रात्रीच्या वेळेची भद्रा दिवसा आली तर, अश्यात भद्राचा दोष लागत नाही. विशेष रूपात हंसी भद्राचा दोष पृथ्वी लोकांवर मानला जात नाही. या प्रकारे भद्रेची भद्रदायिनी अर्थात शुभ फळ देणारी भद्रा मानली जाते.

या व्यतिरिक्त खालील गोष्टींचा देखील विचार केला जातो:

रात्रि भद्रा यदा अहनि स्यात दिवा दिवा भद्रा निशि।
न तत्र भद्रा दोषः स्यात सा भद्रा भद्रदायिनी।।

या संदर्भात, आणखी एक गोष्ट मानली जाते -

तिथे पूर्वार्धजा रात्रौ दिन भद्रा परार्धजा।
भद्रा दोषो न तत्र स्यात कार्येsत्यावश्यके सति।।

अर्थात जर तुम्हाला काही अत्यंत महत्वपूर्ण कार्य करायचे असेल तर अशा स्थितीमध्ये उत्तरार्धाच्या वेळेची भद्रा दिवसा किंवा पूर्वार्धाच्या वेळेची भद्रा रात्री असेल तर याला शुभ मानले जाते. याला अश्या प्रकारेही सांगितले जाते की, जर कधीही तुम्हाला भद्राच्या वेळी काही शुभ कार्य करणे गरजेचे असेल तर पृथ्वी लोकांची भद्रा तसेच भद्रा मुख- काळ याला सोडून तसेच स्वर्ग व पाताळ भद्राच्या पुच्छ काळात शुभ तसेच मंगल कार्य संपन्न केले जाऊ शकतात कारण अश्या स्थितीमध्ये भद्राचा परिणाम शुभ फळदायी असतो.

एक अन्य मतानुसार जर तुम्हाला भद्राच्या दुष्परिणामांपासून दूर राहायचे असेल, तर सकाळी लवकर उठून भद्राची खालील 12 नावांचे स्मरण किंवा जप केला पाहिजे:

भद्राचे हे बारा नाव या प्रकारे आहे

●  धन्या
●  दधिमुखी
●  भद्रा
●  महामारी
●  खरानना
●  कालरात्रि
●  महारुद्रा
●  विष्टि
●  कुलपुत्रिका
●  भैरवी
●  महाकाली
●  असुरक्षयकारी

जर तुम्ही पूर्ण निष्ठेने तसेच विधी पूर्वक भद्राचे पूजन केले आणि भद्राच्या उपरोक्त 12 नावांचे स्मरण करून त्याची पूजा केली तर भद्राचा त्रास तुम्हाला लागणार नाही आणि तुमचे सर्व कार्य निर्विघ्न संपन्न होतात. आमचे म्हणणे आहे की तुम्हाला कुठलेही कार्य करण्याच्या आधी चांगला आणि शुभ मुहूर्त पाहिला पाहिजे तसेच त्याच्या संबंधित प्रत्येक एक उपाय नक्की केला पाहिजे ज्यामुळे तुमचे कार्य निर्विघ्न संपन्न होईल.

अ‍ॅस्ट्रोसेज मोबाइल वरती सर्व मोबाईल ऍप

अ‍ॅस्ट्रोसेज टीव्ही सदस्यता घ्या

   रत्न विकत घ्या

   AstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रत्न

   यंत्र विकत घ्या

   AstroSage.com वर आश्वासनासह यंत्राचा लाभ घ्या

   नऊ ग्रह विकत घ्या

   ग्रहांना शांत करण्यासाठी आणि आनंदी आयुष्य मिळवण्यासाठी यंत्र AstroSage.com वर मिळावा

   रुद्राक्ष विकत घ्या

   AstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रुद्राक्ष