2083 नवरात्र केव्हा आहे? New Delhi, India मध्ये
  • Talk To Astrologers
  • Talk To Astrologers
  • Brihat Horoscope
  • Personalized Horoscope 2024
  1. भाषा :

2083 नवरात्र तारीख, दुर्गा पुजा मुहूर्त आणि महत्व

चैत्र, शरद & गुप्त नवरात्र तारीख New Delhi, India साठी

नवरात्र पर्व हिंदू धर्मासाठी खूप महत्वपूर्ण सण आहे. ह्या पावन मुहूर्तावर दुर्गा मातेच्या नऊ रूपांची आराधना केली जाते म्हणून, हे पर्व नऊ दिवसांपर्यंत साजरे केले जाते. वेद-पुराणांमध्ये दुर्गा मातेला शक्तीचे रूप मानले गेले होते जे असुरां पासून या जगातील लोकांची रक्षा करते. नवरात्रीच्या वेळी देवीचे भक्त आपल्या सुखी जीवन आणि समृद्धीची मनोकामना करतात. चला जाणून घेऊया दुर्गेचे नऊ रूप कोणकोणते आहे-

1.  माँ शैलपुत्री
2.  माँ ब्रह्मचारिणी
3.  माँ चंद्रघण्टा
4.  माँ कूष्मांडा
5.  माँ स्कंद माता
6.  माँ कात्यायनी
7.  माँ कालरात्रि
8.  माँ महागौरी
9.  माँ सिद्धिदात्री

सनातन धर्मात नवरात्र पर्वाचे मोठे महत्व आहे की, हे एका वर्षात पाच वेळा साजरे केले जातात तथापि, यामध्ये चैत्र आणि शरदच्या वेळी येणारी नवरात्र व्यापक स्वरूपात साजरी केली जाते. या मुहूर्तावर देशाच्या बऱ्याच भागांत मेळावे आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होते. देवीचे भक्त भारत वर्षात पसरलेल्या शक्ती पिठाचे दर्शन करण्यास जातात. तसेच शेष तीन नवरात्रींना गुप्त नवरात्र या नावाने जाणले जाते. यामध्ये माघ गुप्त नवरात्र आणि पौष नवरात्र ही आहे. यांना देशाच्या विभिन्न हिश्यात सामान्य रूपात साजरे केले जाते.

नवरात्र पर्वाचे महत्व

जर आपण नवरात्र शब्दाच्या संधीचे विच्छेद केले तर द्यात असते की, हे दोन शब्दाच्या योगने बनलेले आहे. ज्यामध्ये पहिला शब्द ‘नव’ आणि दुसरा शब्द ‘रात्र’ ज्याचा अर्थ होतो नऊ रात्र. नवरात्र पर्व मुख्य रूपात भारताच्या उत्तरी राज्याच्या व्यतिरिक्त गुजरात आणि पश्चिम बंगाल मध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. या वेळी देवीचे भक्त त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नऊ दिवसापर्यंत उपवास ठेवतात.

या काळात दारू, मांस, कांदा, लसूण इत्यादी वस्तू खाणे टाळले जाते. नऊ दिवसानंतर दहाव्या दिवशी उपवास सोडला जातो. नवरात्रच्या दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. सांगितले जाते की, या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला होता.

नवरात्रीने जोडलेल्या परंपरा

भारत सहित विश्व के कई देशों में नवरात्र पर्व को बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया जाता है। भक्तजन घटस्थापना करके नौ दिनों तक माँ की आराधना करते हैं। भक्तों के द्वारा माँ का आशीर्वाद पाने के लिए भजन कीर्तन किया जाता है। नौ दिनों तक माँ की पूजा उनके अलग अलग रूपों में की जाती है। जैसे -

भारत सहित काही देशांमध्ये नवरात्र पर्वाला मोठ्या उत्साहासोबत साजरे केले जाते. भक्त घटस्थापने पासून नऊ दिवसा पर्यंत देवीची आराधना आणि पूजा करतात. नऊ दिवसांपर्यंत देवीची पूजा त्यांच्या वेगवेगळ्या रूपात केली जाते जसे -

नवरात्रीचा पहला दिवस देवी शैलपुत्री ला समर्पित असतो

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. देवी पार्वती शैलीपुत्रीचेच रूप आहे आणि हिमालय राजची पुत्री आहे. माता नंदीची सवारी करते. याच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे. नवरात्रच्या पहिल्या दिवशी लाल रंगाचे महत्व असते. हे रंग साहस, शक्ती आणि कर्माचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना पूजेचे विधान आहे.

नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणी ला समर्पित असतो

नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीला समर्पित असतो. देवी ब्रह्मचारिणी देवी दुर्गेचे दुसरे रूप आहे. असे सांगितले जाते की, जेव्हा देवी पार्वती अविवाहित होती तेव्हा त्यांचे ब्रह्मचारिणी रूप जाणले जात होते. जर देवीच्या ह्या रूपाचे वर्णन केले तर ते श्वेत वस्त्र धारण केले गेले आहे आणि त्यांच्या एका हातात कमण्डल आणि दुसऱ्या हातात जपमाळ आहे. देवीचे स्वरूप अत्यंत जलद आणि ज्योतिर्मय आहे. जे भक्त देवीच्या ह्या रूपाची आराधना करतात त्यांना मोक्ष प्राप्ती होते. या दिवशीचा विशेष रंग निळा आहे जो शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे.

नवरात्रीचा तिसरा दिवस देवी चंद्रघण्टा ला समर्पित असतो

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्र चंद्रघण्टा यांची पूजा केली जाते. पौराणिक कथेच्या अनुसार असे मानले जाते की , देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्या विवाहाच्या वेळी हे नाव ठेवले गेले होते. शिव जी च्या डोक्यावर अर्धा चंद्र या गोष्टीचा साक्षी आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पिवळ्या रंगाचे महत्व असते. हे रंग साहस चे प्रतीक मानले जाते.

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्माण्डा ची पूजा केली जाते

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्माण्डा ची आराधना होते. शास्त्रात देवीच्या रूपांचे वर्णन करून हे सांगितले गेले आहे की, देवी कुष्मांडा वाघावर बसलेली असते आणि त्यांच्या आठ भुजा आहे. पृथ्वीवर होणारी हिरवळ देवीच्या ह्या रूपाचे कारण आहे म्हणून ह्या दिवशी हिरव्या रंगाचे महत्व असते.

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेला समर्पित असते

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेचे पूजन होते. पौराणिक शास्त्रांच्या अनुसार भगवान कार्तिकेयचे नाव स्कंद ही आहे. स्कंदची माता असण्याच्या कारणाने देवीचे हे नाव ठेवल्या गेले. त्यांच्या चार भुजा आहे. माता आपल्या पुत्राला घेऊन वाघाची सवारी करते. ह्या दिवशी पारवा (ग्रे) रंगाचे महत्व असते.

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायिनी यांची पूजा होते

देवी कात्यायनी दुर्गेचे उग्र रूप आहे आणि नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या ह्या रुपाला पूजले जाते. देवी कात्यायनी साहसचे प्रतीक आहे. ती वाघावर असते आणि त्यांच्या चार भुजा असतात. ह्या दिवशी केशरी रंगाचे महत्व असते.

नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा होते

नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीच्या उग्र रूप देवी कालरात्रीची आराधना होते. पौराणिक कथेच्या अनुसार असे सांगितले जाते की, जेव्हा देवी पार्वतीने शुंभ-निशुंभ नामक दोन राक्षसांचा वध केला होता तेव्हा त्यांचा रंग काळा झाला होता तथापि, या दिवशी सफेद रंगाचे महत्व असते.

नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा होते

महागौरीची पूजा नवरात्रीच्या आठव्या दिवशी होते. देवीचे हे रूप शांती आणि ज्ञान यांच्या देवीचे प्रतीक आहे. या दिवशी गुलाबी रंगाचे महत्व असते जे जीवनात सकारात्मकतेचे प्रतीक असते.

नवरात्रीचा शेवटचा दिवस देवी सिद्धिदात्रीला समर्पित असतो

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवी सिध्दिदात्रीची आराधना होते. असे म्हटले जाते की, जो कोणी देवीच्या ह्या रूपाची खऱ्या मनाने पूजा करतो त्याला प्रत्येक प्रकारची सिद्धी प्राप्त होते. देवी सिध्दिदात्री कमळाच्या फुलावर विराजमान आहे आणि त्यांच्या चार भुजा आहे.

भारतात ह्या प्रकारे साजरा केला जातो नवरात्रीचा सण

नवरात्रीच्या पावन वेळी देवी दुर्गेचे लाखो भक्त त्यांची हृदयाने पूजा आराधना करतात. म्हणजे त्यांना त्यांच्या श्रद्धेचे फळ देवीच्या आशीर्वाद रूपात मिळू शकेल. नवरात्रीच्या वेळी देवीचे भक्त आपल्या घरात देवीचे दरबार सजवतात. त्यात देवीच्या विभिन्न रूपांची प्रतिमा किंवा चित्राला ठेवले जाते. नवरात्र च्या दहाव्या दिवशी देवीच्या प्रतिमेला मोठ्या उत्साहात पाण्यात विसर्जन करतात.

पश्चिम बंगाल मध्ये सिंदूर खेळण्याची प्रथा चालत आली आहे. ज्यामध्ये महिला एकमेकांना सिंदूर लावतात. तसेच गुजरातमध्ये गरबा नृत्य यांचे आयोजन करतात त्यात दांडिया नृत्य करतात. उत्तर भारतात नवरात्रच्या वेळी ठीक ठिकाणी रामलीलाचे आयोजन होते आणि दहाव्या दिवशी रावणाचे मोठे मोठे पुतळे बनवून त्यांचे दहन केले जाते.

नवरात्र साठी पूजा सामग्री

●  देवी दुर्गाची प्रतिमा अथवा फोटो
●  लाल ओढणी
●  आंब्याच्या झाडाची पाने
●  तांदूळ
●  दुर्गा सप्तशती पुस्तक
●  लाल कुंकू
●  गंगा जल
●  चंदन
●  नारळ
●  कपूर
●  गहू
●  मातीचे भांडे
●  गुलाल
●  सुपारी
●  नागलीचे पान
●  लवंग
●  इलायची

नवरात्र पूजा विधि

●  सकाळी लवकर उठा. स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा
●  वरती दिली गेलेली पूजा सामग्री एकत्रित करा
●  पूजेची थाळी सजवा
●  देवी दुर्गेच्या प्रतिमेला लाल रंगाच्या वस्त्रात ठेवा
●  मातीच्या भांड्यात गहू लावा आणि नवमी पर्यंत त्यात पाणी टाका
●  पूर्ण विधी अनुसार शुभ मुहूर्त मध्ये कलश स्थापित करा. यामध्ये कलश मध्ये गंगाजल भरा. त्यांच्या मुखावर आंब्याच्या झाडाची पाने लावा आणि वरती नारळ ठेवा. कलशला लाल कापडा बांधा आणि याला मातीच्या भांड्याजवळ ठेवा.
●  फूल, कापूर, अगरबत्ती, ज्योत सोबत पंचोपचार पूजा करा
●  नऊ दिवस देवी दुर्गेच्या संबंधित मंत्रांचा जप करा आणि देवीचे स्वागत करून त्यांना सुख समृद्धीची कामना करा.
●  अष्टमी किंवा नवमीला दुर्गा पूजेनंतर नऊ कन्यांचे पूजन करा आणि त्यांना प्रत्येक प्रकारच्या व्यंजनात (पुरी, चणे, हलवा) याचा भोग लावा.
●  शेवटी दुर्गा पूजेनंतर घट विसर्जन करा यामध्ये देवीची आरती म्हणा त्यांना नेवैद्य दाखवा आणि कलश उचला.

नवरात्रच्या संबंधित पौराणिक कथा

पौराणिक कथेच्या अनुसार सांगितले जाते की, महिषासुर नावाचा राक्षस ब्रम्हाजी चा मोठा भक्त होता. त्याची भक्ती पाहून श्रुष्टीची रचयिता ब्रह्मजीला प्रसन्न झाली आणि त्यांना हे वरदान दिले गेले की, कोणी देव, दानव किंवा पुरुष त्याला मारू शकणार नाही. या वरदानाचा मिळवून महिषासुर मध्ये अहंकार आणि ज्वाला उठली. तो तिन्ही लोकात आपला आतंक माजवू लागला.

ह्या गोष्टीने त्रस्त होऊन ब्रह्म, विष्णू, महेश सोबत सर्व देवतांना मिळून देवी शक्ती च्या रूपात दुर्गेला जन्म दिला. असे सांगितले जाते की, देवी दुर्गा आणि महिषासुर मध्ये नऊ दिवसांपर्यंत भयंकर युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि वाईट गोष्टींवर विजय मिळवला.

एका दुसऱ्या कथेच्या अनुसार, त्रेता युगात भगवान रामाने लंकेवर आक्रमण करण्याच्या आधी शक्तीची देवी भगवतीची आराधना केली होती. त्यांनी नऊ दिवसांपर्यंत देवीची पूजा केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी स्वयं त्यांच्या समोर प्रकट झाली. त्यांनी श्रीरामाला विजय प्राप्तीचा आशीर्वाद दिला. दहाव्या दिवशी भगवान रामाने अधर्मी रावणाला परास्त करून त्याचा वध करून लंकेवर विजय मिळवला. या दिवसाला विजया दशमीच्या रूपात ही जाणले जाते.

आम्ही अशा करतो की, नवरात्रीच्या संबंधित हा लेख तुम्हाला आवडला असेल. ऍस्ट्रोसेज कडून आम्ही कामना करतो की, देवी दुर्गेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. आमच्या कडून आपणास नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

अ‍ॅस्ट्रोसेज मोबाइल वरती सर्व मोबाईल ऍप

अ‍ॅस्ट्रोसेज टीव्ही सदस्यता घ्या

      रत्न विकत घ्या

      AstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रत्न

      यंत्र विकत घ्या

      AstroSage.com वर आश्वासनासह यंत्राचा लाभ घ्या

      नऊ ग्रह विकत घ्या

      ग्रहांना शांत करण्यासाठी आणि आनंदी आयुष्य मिळवण्यासाठी यंत्र AstroSage.com वर मिळावा

      रुद्राक्ष विकत घ्या

      AstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रुद्राक्ष