• Talk To Astrologers
  • Brihat Horoscope
  • Personalized Horoscope 2024
  1. भाषा :

दिवाळी 2025 दिनांक व मुहूर्त

2025 मध्ये दिवाळी कधी आहे

21

ऑक्टोबर, 2025

(मंगळवार)

दिवाळी

दिवाळी मुहूर्त New Delhi, India

लक्ष्मी पुजा मुहूर्त :
17:46:00 ते 17:56:07
कालावधी :
0 तास 10 मिनिटे
प्रदोष काळ :
17:46:00 ते 20:17:59
वृषभ काळ :
19:05:45 ते 21:01:39

दिवाळी महानिशिता काळ मुहूर्त

लक्ष्मी पुजा मुहूर्त :
काहीच नाही
कालावधी :
0 तास 0 मिनिटे
महानिशिता काळ :
23:40:37 ते 24:31:17
सिंह काळ :

दिवाळी शुभ चौघडी मुहूर्त

सकाळ मुहूर्त (चल, लाभ, अमृत):
09:15:27 ते 13:30:44
दुपार मुहूर्त (शुभ):
14:55:49 ते 16:20:55

चला जाणून घेऊया 2025 मध्ये दिवाळी केव्हा आहे व दिवाळी 2025 चे दिनांक व मुहूर्त.

दिवाळी किंवा दीपावली हिंदू धर्माचा एक मुख्य सण आहे. हिंदू धर्मात दिवाळीचे विशेष महत्व आहे. धनतेरस पासून भाऊ बीज पर्यंत जवळ जवळ 5 दिवसापर्यंत चालणारा दिवाळी हा सण भारत आणि नेपाळ सोबत जगात इतर देशात ही साजरा केला जातो. दिवाळीला दीप उत्सव ही म्हटले जाते. कारण दिवाळीचा अर्थ दिव्यांचे प्रज्वलन! दिवाळीचा सण अंधकारावर प्रकाशाच्या विजयाला दर्शवते.

हिंदू धर्मा व्यतिरिक्त बौद्ध, जैन आणि शीख धर्माचे अनुयायी ही दिवाळी हा सण साजरा करतात. जैन धर्मात दिवाळीला भगवान महावीरांच्या मोक्ष दिवस रूपात साजरे केले जाते तसेच शीख समुदाय याला बंदी छोड दिवस म्हणून साजरा करतात.

दिवाळी केव्हा साजरी केली जाते?

1.  कार्तिक महिन्यात अमावास्येच्या दिवशी प्रदोष काळ असल्यावर दिवाळी (महालक्ष्मी पुजन) साजरा करण्याची पद्धत आहे. जर दोन दिवसा पर्यंत अमावस्या तिथी प्रदोष काळाचा स्पर्श न झाल्यास दुसऱ्या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे विधान आहे. हे मत सर्वात जास्त प्रचलित आणि मान्य आहे.
2.  तसेच, एक अन्य मतानुसार, जर दोन दिवस अमावस्या तिथी, प्रदोष काळात नाही आली तर अधल्या दिवशी दिवाळी साजरी केली गेली पाहिजे.
3.  याच्या व्यतिरिक्त जर अमावास्येच्या तिथीचे विलोपन झाले म्हणजे की, अमावास्येची तिथी आली नाही आणि चतुर्दशी नंतर सरळ प्रतिपदा सुरु झाली तर अश्यात पहिल्या दिवशी चतुर्दशी तिथीलाच दिवाळी साजरी करण्याचे विधान आहे.

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पुजन केव्हा करावे?

मुहूर्ताचे नाव वेळ विशेष महत्व
प्रदोष काळ सुर्यास्ता नंतरचे तीन मुहूर्त लक्ष्मी पुजनाची सर्वात उत्तम वेळ स्थिर लग्न असल्यास पुजेचे विशेष महत्व
महानिशीथ काळ मध्य रात्री येणारा मुहूर्त माता काली च्या पुजनाचे विधान तांत्रिक पुजेसाठी शुभ वेळ

1.  देवी लक्ष्मीचे पुजन प्रदोष काळ (सुर्यास्ता नंतरचे तीन मुहूर्त) मध्ये केले गेले पाहिजे. प्रदोष काळाच्या वेळेत स्थिर लग्नात पुजा करणे सर्वोत्तम मानले गेले आहे. या काळात जेव्हा वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशी लग्नात उदित होईल तेव्हा देवी लक्ष्मीचे पुजन केले गेले पाहिजे कारण, ह्या चार ही राशी स्थिर स्वभावाच्या असतात. असे मानले जाते की, जर स्थिर लग्नाच्या वेळी पुजा केली गेली तर देवी लक्ष्मी अंश रूपात घरात थांबते.
2.  महानिशीथ काळाच्या वेळी ही पुजनाचे महत्व आहे परंतु ही वेळ तांत्रिक, पंडित आणि साधकांसाठी जास्त उपयुक्त असते. या काळात माँ कालीच्या पुजनाचे महत्व आहे. याच्या व्यतिरिक्त ते लोक ही काळात पुजा करतात जे महानिशीथ काळाच्या बाबतीत समजतात.

दिवाळी साठी लक्ष्मी पुजन विधी

दिवाळी साठी लक्ष्मी पुजनाचे विशेष विधान आहे. या दिवशी संद्याकाळी आणि रात्रीच्या वेळी शुभ मुहुर्तात देवी लक्ष्मी, विघ्नहर्ता भगवान गणेश आणि देवी सरस्वतीची पुजा आणि आराधना केली जाते. पुराणांच्या अनुसार कार्तिक अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री महालक्ष्मी स्वयं भूलोकात येते आणि प्रत्येक घरात विचारण करते. या काळात जे घर प्रत्येक गोष्टीने स्वच्छ आणि प्रकाशवान आहे तिथे ती अंश रूपात थांबते म्हणून दिवाळीच्या वेळी साफ-सफाई करून विधी पूर्वक पुजन केल्याने देवी महालक्ष्मीची विशेष कृपा असते. लक्ष्मी पुजना सोबत कुबेर पुजा ही केली जाते. पुजेच्या वेळी ह्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे.

1.  दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पुजनाच्या आधी घराची साफ-सफाई करा आणि पूर्ण घरात वातावरणाची शुद्धी आणि पवित्रतेसाठी गंगाजलाचा शिडकाव करा. सोबतच घराच्या दारावर रांगोळी आणि दिवा लावा.
2.  पुजा स्थळी एक चौरंग ठेवा आणि लाल कापड टाकून त्यावर लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती ठेवा किंवा भिंतीवर लक्ष्मीचा फोटो लावा. चौरंग जवळ पाण्याने भरलेला कलश ठेवा.
3.  देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीवर हळदी कुंकू लावा आणि दिवा लावून पाणी, मोळी, तांदूळ, फळ, गुळ, हळदी, गुलाल इत्यादी अर्पित करा आणि देवी महालक्ष्मीची स्तुती करा.
4.  या सोबतच देवी सरस्वती, काली, भगवान विष्णू आणि कुबेर देवाची ही पुजा विधान पूर्वक करा.
5.  लक्ष्मी पूजन संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन केले पाहिजे.
6.  लक्ष्मी पूजा झाल्यावर तिजोरी, मशिनरी आणि व्यापारिक उपकरणाची पूजा करा.
7.  पुजा झाल्यानंतर आप आपल्या श्राद्धे अनुसार गरजू लोकांना मिठाई आणि दक्षिणा द्या.

दिवाळीच्या वेळी काय करावे?

1.  कार्तिक अमावस्या म्हणजे दिवाळीच्या दिवशी प्रातःकाळी शरीरावर तेलाची मालिश नंतर अंघोळ केली पाहिजे. असे मानले जाते की, असे केल्याने धन हानी होत नाही.
2.  दिवाळीच्या दिवशी म्हातारे व लहान मुले सोडून इतर व्यक्तींनी भोजन करू नये.संद्याकाळी लक्ष्मी पुजनाच्या नंतर भोजन ग्रहण करा.
3.  दिवाळीच्या दिवशी पूर्वजांचे पूजन करा आणि धूप व भोग अर्पण करा. प्रदोष काळाच्या वेळी हातामध्ये उल्का धारण करुन पित्रांना मार्ग दाखवा. उल्का म्हणजे दिवा लावून किंवा इतर माध्यमाने अग्नीचा प्रकाश दाखवून पित्रांना मार्ग दाखवा. असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष प्राप्ती होते.
4.  दिवाळीच्या आधी मध्य रात्री स्त्री-पुरुषांनी गाणे, भजन आणि घरात उत्सव साजरा केला पाहिजे. असे सांगितले जाते की, असे करण्याने घरात व्याप्त दरिद्रता दूर होते.

दिवाळीची पौराणिक कथा

हिंदू धर्मात प्रत्येक सणाने बऱ्याच धार्मिक मान्यता आणि कथा जोडलेल्या आहेत. दिवाळीला घेऊन ही दोन पौराणिक कथा प्रचलित आहे.

1.  कार्तिक अमावास्येच्या दिवशी भगवान श्री राम चौदा वर्षानंतर वनवास करून आणि लंकापती रावण याचा नाश करून अयोध्या आले होते. या दिवशी भगवान राम यांच्या अयोध्येत आगमनाच्या आनंदाने लोकांनी दिवे लावून उत्सव साजरा केला होता. तेव्हा पासून दिवाळीची सुरवात झाली.
2.  एक अन्य कथेच्या अनुसार नरकासुर नावाच्या राक्षसाने आपल्या असुर शक्तींनी देवता आणि साधू संतांना खूप त्रास आणि चिंतीत केले होते. या राक्षसाने साधू संतांच्या सोळा हजार स्त्रियांना बंदी बनवले होते. नरकासुरच्या वाढत्या अत्याचाराने चिंतीत देवी देवता आणि साधू संत यांनी भगवान श्री कृष्णाकडे मदत मागितली यानंतर भगवान श्री कृष्णाने कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरकासुराचा वध करून देवता आणि संतांना त्याच्या आतंकाने मुक्ती दिली. सोबतच सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले. याच्या आनंदात दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या अमावास्येला लोकांनी आपल्या घरात दिवे लावले. तेव्हा पासून नरक चतुर्दशी आणि दीपावलीचा सण साजरा केला जातो.

याच्या व्यतिरिक्त दिवाळीला घेऊन अधिक पौराणिक कथा ऐकायला मिळतात.

1.  धार्मिक मान्यता आहे की, ह्या दिवशी भगवान विष्णूने राजा बळीला पातळ लोकांचा स्वामी बनवले होते आणि इंद्राने स्वर्गाला सुरक्षित पाहून आनंदात दिवाळी साजरी केली होती.
2.  याच काळात समुद्र मंथनाच्या काळात क्षिरसागराने लक्ष्मी प्रगट झाली होती आणि त्यांनी भगवान विष्णूला पतीच्या स्वरूपात स्वीकार केले होते.

दिवाळीचे ज्योतिषीय महत्व

हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे ज्योतिषीय महत्व असते. मानले जाते की, विभिन्न पर्व आणि सणांवर ग्रहांची दिशा आणि विशेष योग मानव समुदायासाठी शुभ फळदायी असते. हिंदू समाजात दिवाळीची वेळ कुठल्या ही कार्याच्या शुभारंभाने आणि कुठल्या वस्तूच्या खरेदी साठी खूप शुभ मानले जाते. या विचारांच्या मागे ज्योतिषीय महत्व आहे. दिवाळीच्या आसपास सुर्य आणि चंद्र देव तुळ राशीमध्ये स्वाती नक्षत्रात स्थित असतात. वैदिक ज्योतिषाच्या अनुसार सुर्य आणि चंद्र देवाची स्थिती शुभ आणि उत्तम फळ देणारी असते. तुळ एक संतुलित भाव ठेवणारी राशी आहे. ही राशी न्याय आणि अपक्षपाताचे प्रतिनिधित्व करते. तुळ राशीचे स्वामी शुक्र जो की, स्वयं सौहार्द, परस्पर सद्भाव आणि सन्मानाचे कारक आहे. या गुणांमुळे सुर्य आणि चंद्र देव दोघांचे तुळ राशीमध्ये स्थित होणे एक सुखद व शुभ संयोग असते.

दिवाळीचे आध्यत्मिक आणि सामाजिक दोन्ही रूपाने विशेष महत्व आहे. हिंदू दर्शन शास्त्रात दिवाळीला आध्यत्मिक अंधकारावर आंतरिक प्रकाश, अज्ञानावर ज्ञान, असत्यावर सत्य आणि वाईट गोष्टीवर चांगला उत्सव सांगितले गेले आहे.

आम्ही अशा करतो की, हा दिवाळीचा सण तुमच्यासाठी मंगलमय असो. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि तुमचे आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीने जावो.

अ‍ॅस्ट्रोसेज मोबाइल वरती सर्व मोबाईल ऍप

अ‍ॅस्ट्रोसेज टीव्ही सदस्यता घ्या

      रत्न विकत घ्या

      AstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रत्न

      यंत्र विकत घ्या

      AstroSage.com वर आश्वासनासह यंत्राचा लाभ घ्या

      नऊ ग्रह विकत घ्या

      ग्रहांना शांत करण्यासाठी आणि आनंदी आयुष्य मिळवण्यासाठी यंत्र AstroSage.com वर मिळावा

      रुद्राक्ष विकत घ्या

      AstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रुद्राक्ष