मकर संक्रांत 2068 दिनांक व मुहूर्त

2068 मध्ये मकर संक्रांत कधी आहे?

15

जानेवारी, 2068 (रविवार)

मकर संक्रांत पुजा मुहूर्त New Delhi, India

पुण्य काळ मुहूर्त : 09:21:03 ते 12:30:00

कालावधी : 3 तास 8 मिनिटे

महापुण्य काल मुहूर्त :09:21:03 ते 09:45:03

कालावधी :0 तास 24 मिनिटे

संक्रांत क्षण :09:21:03

चला जाणून घेऊया 2068 मध्ये मकर संक्रांत केव्हा आहे व मकर संक्रांत 2068 चे दिनांक व मुहूर्त.

हिंदू धर्मात मकर संक्रात एक प्रमुख पर्व आहे. भारताच्या विभिन्न भागांमध्ये ह्या सणाला स्थानीय मान्यतांच्या अनुसार साजरे केले जाते. प्रत्येक वर्षी सामान्यतः मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी केली जाते. ह्या दिवशी सुर्य उत्तरायण होतो म्हणजे उत्तर गोलार्ध सुर्याकडे वळते. ज्योतिष मान्यतःच्या अनुसार ह्याच दिवशी सुर्य मकर राशीमध्ये प्रवेश करते.
जास्त करून हिंदू सणांची गणना चंद्रमा वर आधारित पंचांगाच्या द्वारे केली जाते परंतु मकर संक्रांत पर्व सुर्याच्या आधारित पंचांगाच्या गणनेने साजरी केली जाते. मकर संक्रांतीनेच ऋतू परिवर्तन होते. शरद ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरु होते. याच्या फळ स्वरूप दिवस मोठे होतात आणि रात्र छोटी होते.

मकर संक्रांतिचे महत्व

धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोण

भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्व आहे. पौराणिक मान्यतांच्या अनुसार मकर संक्रांतिच्या दिवशी सुर्य देव आपल्या पुत्र शनी देवाच्या घरी जातात कारण, शनी मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे तथापि हे पर्व पिता-पुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेला आहे.
एक अन्य कथेच्या अनुसार असुरांवर भगवान विष्णूचे विजय म्हणून ही मकर संक्रात साजरी केली जाते. असे सांगितले जाते की, मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वी लोकात असुरांचा संहार करून त्यांचे शीर कापून मंदरा पर्वतावर गाडले होते. तेव्हा पासून भगवान विष्णुच्या विजयावर मकर संक्रात पर्व साजरा केला जाऊ लागला.

पीक काढण्याचा सण

नवीन पीक आणि नवीन ऋतूचे आगमन यामुळे ही मकर संक्रात उत्सवात साजरी केली जाते. पंजाब, युपी, बिहार तसेच तामिळनाडू आणि आपल्या महाराष्टात ही वेळ पीक काढण्याची असते म्हणून शेतकरी मकर संक्रातीला आभार दिवसाच्या रूपात ही साजरे करतात. शेतात गहू आणि धान्याची पोती शेतकऱ्यांच्या मेहनतीचे परिणाम असते परंतु हे सर्व ईश्वर आणि प्रकृतीच्या आशीर्वादाने शक्य आहे. पंजाब आणि जम्मू काश्मीर मध्ये मकर संक्रातीला “लोहडी” च्या नावाने साजरी केली जाते. तामिळनाडू मध्ये मकर संक्रात “पोंगल” म्हणून साजरी केली जाते तर, उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये “खिचडी” च्या नावाने मकर संक्रात साजरी केली जाते. मकर संक्रातीवर खिचडी बनवली जाते तर काही ठिकाणी दही चुडा आणि तिळीचे लाडू बनवले जातात.

लौकिक महत्व

असे मानले जाते की, जोपर्यंत सुर्य पूर्वेपासून दक्षिण कडे जाते त्या वेळात सुर्याच्या किरणांना खराब मानले गेले आहे परंतु, जेव्हा सुर्य पुर्वे पासून उत्तरेकडे गमन करायला लागते तेव्हा त्यांची किरणे आरोग्य आणि शांतीला वाढवते. यामुळे साधू संत आणि ते लोक जे आध्यत्मिक क्रियेने जोडलेले आहे त्यांना शांती आणि सिद्धी प्राप्त होते. जर सरळ शब्दात सांगितले गेले तर, जुन्या कटू अनुभवांना विसरून मनुष्य पुढे चालत जातो. स्वतः भगवान कृष्णाने गीता मध्ये सांगितले आहे की, उत्तरायणाच्या सहा महिन्याच्या शुभ काळात जेव्हा सुर्य देव उत्तरायण होते तेव्हा पृथ्वी प्रकाशमय होते अतः ह्या प्रकाशात शरीर त्याग करून मनुष्याचा पुनर्जन्म होत नाही आणि तो ब्रम्हाला प्राप्त होतो. महाभारत काळाच्या वेळात भीष्म पितामह ज्यांना इच्छा मृत्यू वरदान प्राप्त होते. त्यांनी ही मकर संक्रांतीच्या दिवशी शरीर त्याग केले होते.

मकर संक्रांतिने जोडलेले सण

भारतात मकर संक्रांतीच्या काळात जानेवारी महिन्यात नवीन पीक येते. या संधीने शेतकरी नवीन पिकांची छाटणी करून ह्या सणाला धुमधामने साजरे करतात. भारतात प्रत्येक राज्यात मकर संक्रांतीला वेग-वेगळ्या नावांनी साजरे केले जाते.

पोंगल

पोंगल दक्षिण भारतात विशेष करून तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात साजरे केला जाणारा एक महत्वपूर्ण हिंदू पर्व आहे. पोंगल विशेष रूपात तेथील शेतकऱ्यांचे पर्व आहे. यावेळी पीक कापणी झाल्यानंतर लोक आनंद व्यक्त करण्यासाठी पोंगलचा सण साजरा करतात. पोंगल सण ’तइ’ नामक तामिळ महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजे जानेवारीच्या मध्यात साजरे केले जाते. तीन दिवस चालणारे हे पर्व सुर्य आणि इंद्र देवाला समर्पित आहे. पोंगलच्या मध्यात लोक चांगला पाऊस, उत्तम जमीन आणि उत्तम धन धान्य यासाठी परमेश्वराकडे आभार प्रगट करतात. पोंगल सणाच्या पहिल्या दिवशी कचरा जाळला जातो दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पुजन होते आणि तिसऱ्या दिवशी पशु धानाला पुजले जाते.

उत्तरायण

उत्तरायण खास करून गुजरात मध्ये साजरा केला जाणारा पर्व आहे. नवीन पीक आणि ऋतूच्या आगमनाने हे पर्व 14 आणि 15 जानेवारीला साजरे केले जाते. या सणाला गुजरात मध्ये पतंग उडवली जाते सोबतच पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते जे जगभरात प्रसिद्ध आहे. उत्तरायण पर्वावर उपवास ठेवला जातो आणि तीळ व शेंगदाण्याची चिक्की बनवली जाते.

लोहरी

लोहरी विशेष रूपात पंजाब मध्ये साजरा केला जाणारा पर्व आहे जे पिकांच्या छाटणी नंतर 13 जानेवारीला खूप उत्साहात साजरा केला जातो. या प्रसंगी संद्याकाळी होलिका दहन केले जाते आणि तीळ-गुळ आणि मक्का अग्नीला भोग स्वरूपात अर्पण केले जाते.

माघ/भोगली बिहू

आसाम मध्ये माघ महिन्याच्या संक्रांतीच्या पहिल्या दिवशी माघ बिहू म्हणजे भोगाली बिहू पर्व साजरे केले जाते. भोगाली बिहूच्या वेळी खान-पान उत्साहात असते. या वेळी आसाम मध्ये तीळ, तांदूळ, नारळ आणि ऊस खूप पिकतो. अश्या प्रकारच्या व्यंजन आणि पक्वांन्न बनवून खाल्ले जाते. भोगाली बिहू च्या वेळी होलिका दहन केले जाते आणि तीळ व नारळ याने बनवलेले पदार्थ अग्नी देवतेला समर्पित केले जाते. भोगाली बिहू च्या वेळी टेकेली भोंगा नावाचा खेळ खेळला जातो सोबतच, म्हशींचे भांडण ही होतात.

बैसाखी

बैसाखी पंजाब मध्ये शीख समुदायात साजरा केला जाणारा सण आहे. बैसाखीच्या मुहूर्तावर पंजाब मध्ये गहू काढला जातो आणि शेतकरी खूप आनंदित असतात. गव्हाला पंजाब मध्ये शेतकरी कनक म्हणजे सोने मानतात. बैसाखीच्या वेळी पंजाब मध्ये मेळावा लागतो आणि लोक नाचून गावुन आपला आनंद व्यक्त करतात. नदी व सरोवरामध्ये अंघोळीच्या नंतर लोक मंदिरात आणि गुरुद्वारे मध्ये दर्शनाला जातात.

मकर संक्रातीच्या परंपरा

हिंदू धर्मात गोड पक्वांनाला सोडले तर सण अपूर्ण आहे. मकर संक्रांति वर तीळ आणि गुळाचे लाडू आणि घराघरात पुरण-पोळी बनवण्याची परंपरा आहे. तीळ गुळाच्या सेवनाने थंडी मध्ये शरीराला उब मिळते आणि हे आरोग्यासाठी उत्तम असते. मकर संक्रातीच्या दिवशी गोड पदार्थ देऊन किंवा तीळ गुळाचा लाडू देऊन “तीळ गुळ घ्या गोड गोड बोला” असे म्हटले जाते आणि ज्या व्यक्तीं सोबत काही कटुता असते ती दूर केली जाते व नवीन सुरवात लोक या शुभ सणा पासून करतात आणि एका सकारात्मकतेने आपले नवीन वर्षासाठी सुरवात करतात. असे म्हटले जाते की, गोड खाल्याने वाणीमध्ये गोडवा आणि व्यवहारात मधुरता येते आणि आयुष्यात आनंदाचा संचार होतो.

तीळ गुळ व्यतिरिक्त मकर संक्रातीच्या शुभ दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सोबतच देश भारत बऱ्याच राज्यामध्ये मकर संक्रातीला पतंगोत्सव साजरा केला जातो लगातार तीन दिवस आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवल्या जातात आणि रात्रीच्या वेळी दिवे सोडले जातात या काळात पूर्ण आकाश सुंदर असते व लोक ही खूप प्रसन्न असतात आणि पतंग उडवण्याच्या उत्साहात असतात.

या व्यतिरिक्त संक्रांतीच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रात स्त्रिया हळदी कुंकू साजरे करतात. स्रिया आपल्या मैत्रिणींना आणि सुवासिनीला आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावून त्यांना (भेटवस्तू मध्ये हळदी, कुंकू, कंगवा, रुमाल इतर) भेटवस्तू देतात त्याला संक्रांतीचे वाण असे म्हटले जाते. संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा रथ सप्तमी पर्यंत केला जातो.

तीर्थ दर्शन आणि मेळावे

मकर संक्रांतीच्या प्रसंगी देशाच्या बऱ्याच शहरांमध्ये मेळावे लागतात. खास करून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारत इथे मेळाव्याचे आयोजन केले जाते. या क्षणी लाखो श्रद्धाळू गंगा आणि अन्य पावन नदीच्या तीरावर स्नान आणि दान, धर्म करतात. पौराणिक मान्यतेच्या अनुसार स्वतः भगवान श्री कृष्णाने सांगितले आहे की, जो मनुष्य मकर संक्रात च्या दिवशी देह त्याग करतो त्याला मोक्ष प्राप्त होते आणि तो जीवन मरणाच्या गोष्टीतून मुक्त होतो.

First Call Free

Talk to Astrologer

First Chat Free

Chat with Astrologer